
अभिजित आणि मी ऑगस्ट २००९ मध्ये, १५ ऑगस्टचे निमित्त साधून बाइकवरुन लडाखला जाण्याचा योग बऱ्याच वर्षांनी जूळवून आणला. लडाखला जाण्याचे २००३ पासून मनात होते. दरवर्षी एप्रिल महिना आला की लडाखचा विषय उचल खायचा आणि जून सुरू होता-होता ह्या-ना-त्याकारणाने
'ह्या वर्षी नाही रे शक्य. पुढच्या वर्षी बघू.' अश्या एका वाक्याने तो गुंडाळला जायचा. २००९ मध्ये मात्र जानेवारी महिन्यातच मी हा विषय उचलला आणि अभिजितला म्हटले
,"काहीही झाले तरी ह्यावर्षी लडाख सर करायचेचं." अभिसुद्धा वाट बघत होताच. मग सुरू झाली तयारी एका
अविस्मरणीय प्रवासाची ...

लडाख मोहिमेच्या १३ दिवसांच्या आणि त्या आधीच्या तयारीचा सफरनामा मी त्यानंतर ४ महिन्यात अगदी मोकळेपणाने येथे मांडला. अनेकांना तो आवडला आणि त्याचे इ-बूक तयार कर असे मला
महेंद्रदादा आणि
दिपकने सुचवले होते. मात्र ह्या ना त्याकारणाने ते लांबणीवर पडत होते. अभिजितने मात्र परवा भेटल्यावर माझ्या हातात थेट इ-बूकची छापील कॉपीच टेकवली. माझ्यासाठी ते एक सरप्राइझ गिफ्ट होते. त्या इ-बूकला अभिजितने पानभर प्रस्तावना सुद्धा लिहिली आहे.
ज्याना कोणाला हे इ-बूक हवे असेल त्यांनी मला chaudhari.rohan@gmail.com यावर संपर्क करावा. येथे कमेंट मध्ये लिहिलेत तर स्वतःचा इ-मेल लिहायला विसरु नक़ा. अपेक्षा आहे हा सफरनामा फोटोंसकट सलग वाचताना तुम्हाला लडाखमध्ये फिरून आल्यासारखे वाटेल...
अनेक अनेक आभार आणि धन्यवाद ... :)