लेह - लडाखमध्ये झालेल्या ढगफुटी संदर्भात आजच्या लोकसत्तामध्ये अनेक उत्तमोत्तम सदरे आलेली आहेत.. त्यांच्या लिंक्स येथे देत आहे... आपण लोकसत्ता वाचत असाल तर अर्थात आपण त्या अगोदरच वाचल्या असतील. मात्र जे सहसा लोकसत्ता वाचत नाहीत त्यांनी त्या नक्की जाऊन पहाव्या...
स्वतःच्या देशाच्या इतिहासाप्रमाणे त्याच्या भुगोलावरही उदंड प्रेम करणाऱ्या एका सामान्य भट्क्याची भ्रमणगाथा ... !!!
Sunday, 8 August 2010
लेहमध्ये ढगफुटी - अधिक बातम्या ...
लेबले:
B.R.O.,
Indian Army,
ladakh,
leh city,
loksatta,
shaitan nala
Friday, 6 August 2010
लेहमध्ये ढगफुटी ... :(
आज सकाळी-सकाळी समजले कि लेह-लडाख भागात अचानक झालेल्या ढगफुटीने अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांचे बळी गेले आहेत तर मालमत्तेचीही बरीच हानी झाली आहे. मनाली ते लेह महामार्ग बंद झालेला असून वाटेमधले काही ब्रिज पडले आहेत. गेल्यावर्षी आम्ही काही जणांनी बाईकवरून जम्मू - श्रीनगर - द्रास - कारगिल - लेह आणि मग - सरचू - मनाली मार्गे दिल्ली असा १३ दिवसांचा प्रवास यशस्वी केला होता. आज ह्याबाबत लिहिण्याचे कारण असे कि गेल्यावर्षी नेमके ६ ऑगस्ट या तारखेलाच आम्ही आमचा प्रवास सुरु केला होता. आज त्या मोहिमेला १ वर्ष पूर्ण होत आहे. आज हि बातमी वाचल्यानंतर तो केलेला सर्व प्रवास जसाच्यातसा डोळ्यासमोरून तरळून गेला. आम्हाला वाटेमध्ये मदत करणारे ते लोक, लष्कराचे जवान, आम्ही लेहमध्ये जिथे राहिलो ते 'नबी'चे घर, त्याचे कुटुंब, आमचा ड्रायव्हर तेनसिंग हे सर्व सुखरूप असतील अशी मनाला खात्री आहे...
सप्टेंबर ते डिसेंबर २००९ ह्याकाळात केलेल्या लडाखवरील माझ्या लिखाणाला अनेकांनी प्रतिसाद दिला. २०१० सालासाठी लडाखला जाणारे उत्सुक असलेल्या अनेकांनी मला वैयक्तिकरित्या संपर्क साधून माहिती घेतली आणि मोहिमा आखल्या. आज त्यापैकी काही लेह-लडाख करून सुखरूप परत आलेले आहेत तर काही नेमके तिकडे अडकले आहेत. काही वाटे मध्ये सुद्धा असतील. काही जे अजून निघायचे आहेत त्यांनी निराशेने आपल्या मोहिमा एक तर रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत. तिथली परिस्थिती गंभीर आहे. दळण-वळण आणि संपर्क पुन्हा स्थापित करायला पुढचे काही दिवस नक्कीच जाणार आहेत. लष्कराने पुन्हा एकदा जोमाने काम सुरु केले आहे. B .R .O . म्हणजे बोर्डर रोड ऑर्गनायझेशनने तर आपले कार्य एकदम जोरात सुरु केले असेल याची मला खात्री आहे. त्या बाबतीत त्यांचा हात कोणी धरू शकत नाही...
लडाखवरील आलेली आपत्ती दूर होवो आणि तिकडे गेलेले सर्वजण सुखरूप असोत हीच प्रार्थना... मृत्युमुखी पडलेल्या सदैव मदतीस तत्पर आणि मनमिळावू अश्या तिथल्या स्थानिक लोकांना मनापासून श्रद्धांजली... का कोण जाणे माझे मन पुन्हा एकदा लवकरच लडाखकडे जावे असे म्हणते आहे...
सप्टेंबर ते डिसेंबर २००९ ह्याकाळात केलेल्या लडाखवरील माझ्या लिखाणाला अनेकांनी प्रतिसाद दिला. २०१० सालासाठी लडाखला जाणारे उत्सुक असलेल्या अनेकांनी मला वैयक्तिकरित्या संपर्क साधून माहिती घेतली आणि मोहिमा आखल्या. आज त्यापैकी काही लेह-लडाख करून सुखरूप परत आलेले आहेत तर काही नेमके तिकडे अडकले आहेत. काही वाटे मध्ये सुद्धा असतील. काही जे अजून निघायचे आहेत त्यांनी निराशेने आपल्या मोहिमा एक तर रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत. तिथली परिस्थिती गंभीर आहे. दळण-वळण आणि संपर्क पुन्हा स्थापित करायला पुढचे काही दिवस नक्कीच जाणार आहेत. लष्कराने पुन्हा एकदा जोमाने काम सुरु केले आहे. B .R .O . म्हणजे बोर्डर रोड ऑर्गनायझेशनने तर आपले कार्य एकदम जोरात सुरु केले असेल याची मला खात्री आहे. त्या बाबतीत त्यांचा हात कोणी धरू शकत नाही...
लडाखवरील आलेली आपत्ती दूर होवो आणि तिकडे गेलेले सर्वजण सुखरूप असोत हीच प्रार्थना... मृत्युमुखी पडलेल्या सदैव मदतीस तत्पर आणि मनमिळावू अश्या तिथल्या स्थानिक लोकांना मनापासून श्रद्धांजली... का कोण जाणे माझे मन पुन्हा एकदा लवकरच लडाखकडे जावे असे म्हणते आहे...
लेबले:
bike expidition,
ladakh,
leh city,
sarchu
Monday, 26 April 2010
लडाख सफरनामा आता इ-बूक रुपात ... !

ज्याना कोणाला हे इ-बूक हवे असेल त्यांनी मला chaudhari.rohan@gmail.com यावर संपर्क करावा. येथे कमेंट मध्ये लिहिलेत तर स्वतःचा इ-मेल लिहायला विसरु नक़ा. अपेक्षा आहे हा सफरनामा फोटोंसकट सलग वाचताना तुम्हाला लडाखमध्ये फिरून आल्यासारखे वाटेल...
अनेक अनेक आभार आणि धन्यवाद ... :)
Wednesday, 3 February 2010
ट्रेक टू अरावली - 'माउंट अबू'कडे प्रयाण ... !
"मागे ठेवायच्या त्या फ़क्त पाउलखूणा आणि सोबत घ्यायच्या त्या फ़क्त आठवणी."
सकाळी उठलो आणि आवरून घेतले. आज अर्ध्या दिवसात माउंट आबू मधल्या काही महत्वाच्या जागा बघायच्या होत्या. आम्ही फिरायला एक गाडी केली अणि 'महादेव मंदिर'कडे प्रस्थान केले. तिकडे पोचलो तर बाहेरच एकजण डालिंब घेउन बसला होता. मी आणि ऐश्वर्याने अभिकडे (आमचा खजिनदार...) 'घे.. ना..' ह्या अर्थाने पाहिले. झाली सुरू आजची खादाडी. तिकडून मग ब्रम्हकुमारी मंदिरावरुन पुढे जात 'गुरुशिखर'ला पोचलो. हे राजस्थानमधले सर्वात उंच शिखर आहे. बऱ्यापैकी वरपर्यंत गाडी जाते. मग पुढे चढून जावे लागते. पण फारवेळ नाही लागत. शिवाय वाटेवर खायची दुकाने आहेतच. तेंव्हा.....!!! माथ्यावर गुहेमध्ये दत्तात्रयांचे मंदीर आहे. तिकडे दर्शन घेउन खाली उतरलो. सकाळभरात काही जागा बघून आम्ही 'दिलवाडा मंदिर' बघायला पोचलो. आत तशी गर्दी होती म्हणुन आधी जेवून घ्यायचे ठरले. आजूबाजुला आपल्याला हवे तसे काही धड मिळेल असे वाटत नव्हते. तरी एका होटेलमध्ये गेलो. त्याच्याकडे डोसा, सांबर, थाळी असे प्रकार होते. मग थोड़ा आडवा हात मारून घेतला. तुम्ही कधी माउंटआबूला गेलात तर 'दिलवाडा मंदिर' न बघता येऊ नाका. येथले सर्वात मोठे प्रेक्षणीय स्थळ आहे हे. अतिशय सुंदर कलाकुसर केलेले जैन मंदीर हे ११ व्या शतकात बांधले गेलेले आहे. आतमध्ये एकुण ५ मंदिरे आहेत. आपण आत गेलो की २०-२५ जणांच्या ग्रुपला एक असा माहितिगार देतात. अर्थात तो थोड़ेफार पैसे मागतो पण माहिती मस्त देतो. इकडून मग आम्ही 'अचलगढ़'ला गेलो. हा किल्ला सुद्धा राजा कुंभा यांनी बांधलेला आहे. पण माथ्यावर फार काही राहिलेले नाही. अनुजा आणि संजू तर वरती आलेच नाहीत. खालती खरेदी करत बसले. मी, अभि, मनाली आणि ऐश्वर्या वरती जाउन भटकून आलो. ४ वाजत आले होते. तेंव्हा आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.
.
.
Tuesday, 2 February 2010
ट्रेक टू अरावली -'कुंभळगड़' मार्गे 'ठंडीबैरी' ... !
कालरात्री आमच्या 'एक्टिंग एपिसोड' नंतर सुद्धा आम्हाला थोडेसे 'घोरायण' ऐकावे लागले होतेच. ह्या ट्रेकमध्ये सकाळी खाणे आणि रात्री घोराख्यान ऐकणे हेच सुरू होते. गेल्या २ दिवसात रणकपूर मार्गे फूटादेवल आणि तिकडून कुंभळगड़ असा पल्ला आम्ही गाठला होता. आज सकाळी लवकरच निघायचे म्हणून आवरा-आवरी सुरू होती इतक्यात ग्रुपमधले एक काका शुजची जोड़ी घेउन आले. 'अरे ये शुज मेरे बैग मी शायद २ दिन से है. मेरे तो नहीं है. आपमेसे किसके है क्या?' २ दिवसापासून अभिचे गायब असलेले शुज कुठे गेले होते ते आम्हाला आत्ता समजले. ह्या काकाने स्वतःचे समजुन ते बैगमध्ये घातले होते आणि अभि आपला २ दिवस फ्लोटर्सवर ट्रेक करतोय. अखेर अभिच्या शुजची आणि पायाची भेट झाली. अभि मात्र वाटत असुनही त्या काकांना काही विशेष बोलला नाही. संजूने मात्र त्याचा ठेवणीतला शब्द वापरलाच. 'जड़ बुद्धि'च आहे हां. 'जड़ बुद्धि' हा संजूचा खास शब्द. संस्कृत शिक्षक असल्याने एखाद्या घडलेल्या गोष्टीवर मध्येच टिपणी म्हणुन एखादे सुभाषीत सुद्धा सोडायचा तो. कोणी काही मंदपणा केला की तो झाला जड़बुद्धि.
कुंभळगड़ --- राजा कुंभा यांनी १५व्या शतकात हां किल्ला बांधला. ह्या किल्याला ३६ किमी लांब तटबंदी आहे... होय..होय.. मी '३६' बोलतोय. ३.६ नाही... चीनच्या भिंतीनंतर जगातली ही सर्वात लांब सलग भिंत आहे. नव्हते ना माहीत.. तिकडे जाईपर्यंत आम्हाला सुद्धा माहीत नव्हते. ती संपूर्ण तटबंदी बघून ट्रेकचे सार्थक झाले एकदम. बालेकिल्यावरून ह्या संपूर्ण तटबंदीचे आणि त्यावर असणाऱ्या बुलंद बुरुजांचे दृश्य एकदम जबरदस्त दिसते. तटबंदी चांगली ६-८ मीटर रुंद आहे. शिवाय आतल्या बाजूने सुद्धा १० एक मीटर खोल. किल्यात उतरायला ठिकठिकाणाहून बांधीव वाटा आहेत. (यांना बहुदा आपल्याकडे फांजी म्हणतात.. आत्ता नक्की आठवत नाही) किल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला गणपतीचे मंदीर आहे. तिकडून पुढे बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. मार्ग म्हणजे प्रशत्र बरं का.. एकावेळी २ हत्ती जातील डुलत-डुलत जातील ईतका. तो सुद्धा अतिशय सुस्थितीत. दोन्ही बाजूला छानपैकी तांबडया रंगाच्या दगडांची तटबंदी आणि फुलांच्या बागा. आपण जस-जसे वर-वर जातो तसा उजव्या हाताला असणारा किल्ल्याचा प्रशत्र भाग दृष्टीक्षेपात येतो. किल्यात दुरवर असणारे 'जैनतीर्थ' हे या गडामधील सर्वात जून बांधकाम आहे. त्या अलीकडे निळकंठेश्वर महादेवाचे मंदीर आहे. यात असणारी शिवपिंडी ५ फुट उंच आहे. राजा कुंभा म्हणे इतका उंच आणि भारदस्त होता की तो जमीनीवर बसून पिंडीवर अभिषेक करत असे. बाजुलाच प्रचंड मोठा सभामंडप आहे. एकामागुन एक दरवाजे पार करत आपण वर-वर जात असतो. मध्ये एकेठिकाणी 'भैरू का शीर' म्हणुन समाधीस्थळ आहे. शीर इकडे आणि त्याच्या भैरूचे धड मात्र वरती 'बदाम महल'मध्ये आहे. ह्या मागची कथा काही कळली नाही. ६ व्या दरवाज्यानंतर डाव्या हाताला एक वास्तू आहे. हे आहे 'महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ' ... ७ व्या दरवाज्यानंतर मात्र रस्ता लहान होतो. इकडून बालेकिल्ला सुरू होतो. बालेकिल्ल्यावर 'बदाम महल' आहे. अर्थात राजनिवासस्थान. आजही संपूर्ण वास्तु नीट जपलेली आहे. महालाचा काही खाजगी भाग सोडला तर संपूर्ण महाल बघता येतो. मौर्य साम्राज्याच्या राजा संप्रती याचे दुसऱ्या शतकात येथे राज्य होते असे काही पुरावे आहेत. पण सध्या जे अतिभव्य रूप या किल्ल्याला आहे त्याचे संपूर्ण श्रेय राजा कुंभा यांचे आहे.
अवघ्या ३ तासात सर्व किल्ला बघून ३६ किमी. तटबंदीवरुन फेरा मारणे अशक्य होते. तेंव्हा गडावरील सर्व महत्वाची स्थळे बघून आम्ही खाली परतलो संपूर्ण गड़ बघून झाल्यावर तिकडेच असणाऱ्या राजस्थान टुरिझमच्या होटेलमध्ये गेलो. किमान ओमलेट तरी मिळेल ह्या आशेने. आणि काय आश्चर्य... होते की तिकडे. मग आम्ही ३ दिवसांपासून सुरू असलेला आमचा 'नॉन-व्हेज उपवास' मोडीत काढला.ओमलेट नाश्ता झोडला आणि ११ वाजता आम्ही पुन्हा एकदा 'राम पोल'कडे परतलो. शिवसिग आमची वाट बघत होताच. "चलो चलो. आप सबसे पिछे हो. बाकी सब आगे निकल गये." आम्ही म्हटले,"जाने दो. जिसके लिए यहातक आये कमसे कम वो किला तो ढंग से देख लेते. आप चलो हम आते है." पुन्हा एकदा 'राम पोल'चे ते अतिभव्य दृश्य डोळे भरून बघून घेतले आणि पुढच्या वाटेला लागलो. आता खरंतरं आमचा परतीचा ट्रेक सुरू झाला होता. आज दुपारभरात १३ किमी.चे कुंभळगड़ जंगल पार करत 'ठंडीबैरी' या ठिकाणी असणाऱ्या कैंपसाइटला पोचायचे होते. कुंभळगड़ मागे टाकत आम्ही आता जंगलाच्या दिशेने निघालो. जस-जसे पुढे जात होतो तशी वाट उतरत होती. गडाचा बदाम महाल मात्र मागे अजून सुद्धा साद घालत होताच. आमच्या बराच वेळ आधी निघालेले पुढच्या ट्रेकर्सचे आवाज येऊ लागले होते. नंतर तर वाट एकदम खाली उतरायला लागली. बघतो तर काय... पुढे शिवसिंग पाठीवर ३ सॅक्स घेउन वाट उतरत होता. कोणा दोघा ट्रेकर्सनी (? ह्यांना ट्रेकर्स का म्हणावे???) त्यांचे सामान उचलत नाही म्हणुन शिवसिंग गाइडकडे दिले होते. ते २ कोण असणार हे सुद्धा आम्हाला ठावूक होते. शिवसिंगपर्यंत जाउन पोचलो आणि त्याला म्हणालो,"आपका बैग हमें देदो. थोड़ा सामान कम हो जाएगा" तो मात्र काही तयार झाला नाही. त्याला आणि इतर २ जणांना पार करत आम्ही वेगाने उतरु लागलो.
बघता-बघता अवघ्या २० मिनिट्समध्ये अनेक जणांना मागे टाकत खालच्या सपाटीला पोचलो सुद्धा. कुठे जाउन थांबायचे ते शिवसिंगला विचारून ठेवलेले होतेच. बोराची झाडे आणि शेजारी एक थंड पाण्याची विहीर होती. तिकडे जाउन टेकलो. शिवसिंग आणि मागुन येणाऱ्या काही लोकांकडून समजले की २-३ जण रस्ता चुकले. मग शिवसिंग, अभि आणि संजू पुन्हा त्यांना शोधायला मागे गेले. आम्ही तोपर्यंत जेवणाची तयारी केली. यथेच्छ पोटोबा केला आणि थोडा वेळ निवांत पडलो. अभि आणि मनाली बोराच्या झाड़ावर चढून बसले होते तर त्या झाड़ाखाली अनुजा ताणून देऊन चक्क झोपली होती. तिला जेवण चढले होते बहुदा. दिपक तर विहिरीच्या काठावर वामकुक्षी घेत होता आणि संजू तोंडाला साबण लावून बसला होता. मी ह्या सर्वांचे फोटो काढत होतो. पण ऐश्वर्या कुठे होती??? बघतो तर दुसऱ्या एका बोराच्या झाड़ाखाली ही पोरगी बोरं खात बसली होती. आता काय बोलावे हेच समजेना... मला माझा मित्र विवेकचे वाक्य आठवले.
तासभर झाल्यावर शिवसिंगने 'आगे बढो'चा इशारा दिला. ह्यावेळी मात्र आम्ही सर्वात पुढे सटकलो. रस्ता अगदी सरळ होता. चुकायचा प्रश्न नव्हता. आम्ही आज खाताना गप्पा कमी मारत होतो. जंगलातून जाताना आवाज जितका कमी कराल तितके वन्यजीव दिसायची शक्यता अधिक. थोड्याच वेळात बाजूच्या झाड़ीतून काहीतरी पळाले. बघतोय तर मोठी जंगली कोंबडी होती. फोटो काढता येइल इतका अवसर मात्र तिने काही दिला नाही. आमच्यात सर्वात पुढे दिपक होता. त्याला स्पष्टपणे आणि मला ओझरते रानडुक्कर दिसले. चाहुल लागल्या-लागल्या ते पसार झाले. नंतर काही दिसले नाही. अगदी माकडे सुद्धा नाही. पक्षी साद घालायचे मात्र दर्शन द्यायचे नाहीत. आज आमचा चालायचा वेग जोरात होता. एकतर वाट सरळ आणि जंगलातील होती. ४ च्या सुमारास कुंभळगड़च्या जंगलातून बाहेर पडून ठंडीबैरी गावाकडे पोचलो. छोटेसे गाव होते एकदम. गावाच्या थोडेच पुढे राजस्थान वनखात्याचे गेस्टहाउस आहे. तिकडे जाउन पोचलो. गेस्टहाउस मध्ये २ मोठी खोली आणि एक लहान खोली होती. लहान खोलीत २ बेड सुद्धा होते. ते अर्थात मुलींनी पटकावले. आम्ही मोठ्या खोलीत जमीनीवर अंथरुण घालून सामान सेट करून टाकले. आज बाहेर झोपणे शक्य नसल्याने त्या खोलीत 'घोरायण' ऐकावे लागणार होते. संध्याकाळ झाली तसे आम्ही आसपास भटकायला बाहेर पडलो. जास्त लांब जाऊ नका असे आम्हाला सांगितले होते. जवळच एक तलाव होता तिकडे गेलो आणि अंधार पड़ेपर्यंत परत आलो. मध्ये-मध्ये मोरांचे आवाज ऐकायला यायचे पण दिसत नव्हते कुठे. आज ट्रेकची शेवटची रात्र होती. उदया सकाळी इकडून निघून मुछाला महावीर बघून पुन्हा रणकपूरला पोचायचे होते. तेंव्हा आजचा डिनर ख़ास राजस्थानी होता. 'दाल-बाटी-चोरमा' ... बाटी थोड़ी कड़क झाली होती पण मग एकदाच सर्व फोडून घेतल्या आणि मग नरम होण्यासाठी दाल मध्ये बुडवून ठेवल्या. तेवढ्या वेळात आपला 'चोरमा' खाणे सुरू होतेच. त्यानंतर पुन्हा दाल-बाटी. चांगले ४५ मिनिटे जेवण झाले. जेवण झाल्यावर ९ वाजता गेस्ट हाउसच्या गच्चीवर जाउन बसलो. इतर कोणी कैंपफायर करायला नव्हतेच. तेंव्हा मग पुन्हा 'लाफ्टर चैलेंज राजू' सुरू झाले. काही वेळाने अभिला डोंगरामागून उजेड येताना दिसला. आम्हाला आधी वाटते की कुंभळगड़च्या लाइट्सचा प्रकाश इथपर्यंत येतोय की काय.पण नाही लाईट डोंगरातून वर आला तेंव्हा कळले की तो तर चंद्र होता. आम्ही गप्पा टाकत बसलो होतो तोच त्या गेस्टहाउसचा एक माणूस आला. गच्ची बंद करायची आहे असे सांगून उगाच आम्हाला खाली पाठवून दिले. कैंपलीडर आम्हाला कैंपफायर सुद्धा करू देईना. मग अभि भडकला आणि जाउन भाटीला बडबडला. YHAI नॅशनल ट्रेक्समध्ये कसे कैंपफायर केले जाते, कैंपलीडर सर्वांना कसा त्यासाठी तयार करतो वगैरे-वगैरे. गच्चीवर नाही तर गेस्टहाउसच्या बाहेरच आम्ही १०:३० पर्यंत गप्पा मारत बसलो आणि मग झोपायला गेलो. सर्वजण झोपले होते पण मुलांच्या खोलीत दुसऱ्या दिवशीचे सामान लावत आम्ही चौघे दंगा करत बसलो होतो. शेजारी घोरायण सुरू झाले होते. संजू मध्येच जोरात ओरडायचा की सर्व शांत व्हायचे आणि पुन्हा काही सेकंदात सुरू... मी आणि दिपक हसून हसून वेडे झालो होतो. दिपक जास्त हसला की मी 'राजू'च्या स्टाइलमध्ये दिपक.. ए.. दिपक... असे बोलायचो की मग संजू फुटायचा.. अभि मात्र 'चायला गप्प बसा रे' आता असे बोलायचा मध्येच. स्वतःला कितीही त्रास झाला तरी लोकांना त्रास होऊ नये ह्यासाठी अभि सदैव तत्पर... पण मी मात्र जे लोक आम्हास त्रास देतील त्यांस आम्ही कसे ते सोडावे??? ह्या वृत्तीचा... रात्री बऱ्याच उशिराने आम्ही गुडुप झालो. उदया सकाळी-सकाळी निघून परतीच्या मार्गाला लागायचे होते... आणि मग तिथून 'माउंट आबू'ला जायचे बाकी होतेच की...
आज ट्रेकचा महत्वाचा दिवस होता. आम्ही निघालो आणि ८ वाजता कुंभळगड़चा पहिला दरवाजा 'हनुमान पोल' पार करून आत प्रवेश करते झालो. प्रवेश केल्या-केल्या समोर जे दिसले ते अतिभव्य होते. किमान १० माणसी उंच असा 'राम पोल' हा गडाचा दुसरा दरवाजा आणि त्याला संरक्षित करणारे त्याचे बुलंद भक्कम तट-बुरुज. अवर्णनीय आणि अप्रतिम असे ते दृश्य होते. डोळ्यात साठवलेले ते दृश्य मग कमेरा मध्ये सुद्धा साठवले. आम्हाला गड़ बघायला ३ तास दिले होते शिवसिंगने. मग सामान तिकडेच ठेवले आणि आम्ही त्या बुलंद किल्ल्यात प्रवेश करते झालो.
महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ ...
निळकंठेश्वर महादेवाचे मंदीर ...

आपल्याला २ वेळाच भूक लागते. 'एकदा खाण्याआधी' आणि 'दुसरी खाण्यानंतर'... हे बहुदा ऐश्वर्याला तंतोतंत लागु पड़ते...
ऐश्वर्या... बोरे.. 'आयमिन पुरे' ...
दिपक... ए... दिपक...
संस्कृतपंडित संजू...
.
.
पुढील भाग : ट्रेक टू अरावली - 'माउंट अबू'कडे प्रयाण ... !
.
.
Friday, 29 January 2010
ट्रेक टू अरावली - 'वीरों का मठ' मार्गे 'कुंभळगड़' ... !
रस्त्याच्या दोन्ही बाजुला आता ऊसच-उस होता. पण एक मिळेल तर शप्पथ. ऐश्वर्याचे 'मला ऊस.. मला ऊस..' सुरूच होते. शेवटी म्हटले 'आता त्या शेतात घुस.' जागोजागी ऊस आणि त्याच्या बाजुला बैलजोड़ीचे रहाट. दूरच्या शेतात एक मस्त दृश्य टिपायला मिळाले. आपल्या बैलजोड़ी सोबत शेतकरी रहाटावर पाणी उपसत होता आणि ते पाणी पाटातून वाहत शेताकडे जात होते. ते दृश्य टिपायला मी एकटाच मागे थांबलो होतो. बाकी सर्व पुढे निघून गेले होते. काही वेळात मी पुढे जाउन पोचलो तर सर्वजण रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसले होते आणि उरलेली सिताफळे आणि मोसंबी खात होते. कितीही खाल्ली तरी मन भरेना अशी गोड गोड सिताफळे होती ती. बाजुच्या एका गावातली शाळात सुटली होती आणि लहान लहान मूले सर्वांकडे पेन मागत होती. (लडाखमध्ये सुद्धा आम्हाला हाच अनुभव बऱ्याच ठिकाणी आला की मूले खाऊ किंवा पैसे ऐवजी पेन मागत आहेत) आमच्याकडे मात्र त्यांना द्यायला पेन काही नव्हते... :(
आता कुंभळगड़ अगदीच जवळ आले होते. आम्ही आता 'आरेठ की भागल' या गावातून पुढे निघालो. गावातल्या शाळेसमोर एका पिंपळाच्या झाडावर चिक्कार वटवाघुळे लटकली होती. चक्क दुपार असून सुद्धा. थोड़े पुढे जातो तोच आमचा गाईड शिवसिंग म्हणाला,"यहाँसे आगे जा रहे हे; तो मेरे घर भी चलिए". अरेच्या हे तर त्याचेच गाव होते. तो आम्हाला त्याच्या घरी घेउन गेला. काहीजण मात्र 'नही-नही हम आगे जायेंगे' करत पुढे निघून गेले. कसे असतात ना काही लोक. तो इतका घरी बोलावतोय आणि हे आपले सुटले आहेत. आम्ही मात्र त्याच्या घरी गेलो. चांगले १ मजले घर होते. खालची खोली बंद होती. बहुदा सामानाची असावी. बाहेर छोटासा गोठा होता. त्यात एक गाय आणि तिचे वासरू होते. आम्ही जीनेचढून वर गेलो. छोटीशी गच्ची होती आणि मागे खोल्या. आम्ही गच्चीवर विसावलो. शिवसिंगने आतून २-३ कटोरी भरून दही आणले. ऐश्वर्याला देत म्हणाला,"ये भी चख के देखिये." मग त्याने बाकीच्यांना सुद्धा दही दिले. इतके गोड दही नाही बा मी चाखले कधी. काही वेळात आम्ही तिकडून निघालो आणि पुढच्या मार्गाला लागलो. आता उसाची शेती संपली होती आणि रस्त्याच्या बाजुला झाडांवर सिताफळे दिसत होती. गावानंतर कच्चा रास्ता संपला आणि आम्ही पुन्हा डांबरी रस्त्याला लागलो. कुंभळगड़चा बोर्ड सुद्धा दिसला. थोडेसे पुढे लगेच रस्त्याच्या बाजुला 'लकी होटेल' लागले. आमचा आजचा ठिकाणा हाच होता.
दररोज रात्री ८ ते ८:३० ह्या अर्ध्या तासात इकडे 'लाईट शो' असतो. पहिल्या रामपोल दरवाजा ते वरच्या बदाम महालापर्यंत सर्वत्र यल्लो लाइट्स लावलेले आहेत. अत्यंत सुंदर दिसतो कुंभळगड़. आपल्याकडे कधी करणार असे टुरिझम देवजाणे. तिकडे अर्धातास थांबुन आम्ही काही फोटो घेतले आणि मग जेवणासाठी होटेलवर परतलो. जेवल्यानंतर सुद्धा आम्ही बराच वेळ गप्पा मारत होटेल बाहेर रस्त्यावर बसलो होतो. झोपायला म्हणून आत गेलो तेंव्हा घोरण्याचा इतका आवाज येत होता की असह्य झाले होते. शेवटी सामान उचलले आणि बाहेर येउन झोपलो. आत्ता कुठे ९:३० होत होते आणि ह्यांचे फुल ऑन 'घोरायण' सुरू झाले होते. ऐश्वर्या, मनाली आणि अनुजा सुद्धा त्यांच्या खोलीमधून बाहेर येउन आमच्या बरोबर गप्पा मारत बसल्या होत्या. अचानक माझ्या अंगात काय आले माहीत नाही पण मी 'राजू श्रीवास्तव'ची एक्टिंग सुरू केली. त्या नंतर जे काही घडले ते अवर्णनीय आहे. राजूने लाफ्टर चाल्लेंज मध्ये जे-जे एपिसोड करून दाखवले ते-ते सर्व मी तसेच्या तसे डायलोंग आणि एक्टिंग सकट प्रेझेंट केले. खरंतरं हां कैंपफायर आयटम होता. संजू, अनुजा आणि ऐश्वर्या इतके जोरात हसत होते की झोपलेले जागे झाले आणि घोरणारे सुद्धा उठले. सत्संग प्रवचन पासून शोलेवाला, आणि डिनर पासून ते न्यूज़ रीडर पर्यंत असे सर्वच्यासर्व आयटम मी १ तास करून दाखवले. संजू पायवर घेउन आणि लोळून-लोळून राक्षसी हास्यासकट फुटला होता. अखेर १०:३० वाजता मुलींच्या खोली मधून एक बाई बाहेर आली आणि तिने कैंपलिडरकडे तक्रार केली. आम्ही म्हटले १०:३० तक तो कैंपफायर का टाइम होता हे सर. पण मग आम्ही झोपून गेलो. त्या एकतासात जी काही मज्जा आली ती पुन्हा नाही आली कधी. मला सुद्धा आता ते सर्व डायलोंग पाठ राहिलेले नाहीत. पुन्हा एकदा राजूचे सर्व एपिसोड बघावे लागतील बहुदा... :D हाहा.. गेले २ दिवस आम्हाला जागे ठेवून स्वतः घोरायण करणारया घोरटयान्ना आज आम्ही जागे ठेवले होते. थोड्या वेगळ्या स्टाइलने. शेवटी ११ वाजता आम्ही गुडुप झालो. सकाळी लवकरच निघायचे होते... कुंभळगड़ बघायला...
.
.पुढील भाग : ट्रेक टू अरावली -'कुंभळगड़' मार्गे 'ठंडीबैरी' ... !
.
.
लेबले:
kumbhalgad,
rajasthan,
कुंभळगड़,
राजस्थान
Thursday, 28 January 2010
ट्रेक टू अरावली - मालघाट मार्गे फूटादेवल ... !
संध्याकाळ होत आली तसे आम्ही आसपास भटकायला निघालो. जैन मंदिरासमोरच एक पडके शंकरमंदिर होते. तिकडे शेजारी राहणारे पुजारी चक्क मराठी आणि आपल्या 'कल्याण'चे निघाले. नाव लक्ष्यात नाही आता त्यांचे. तिकडूनच पुढे खाली अजून एक देऊळ आहे. पण आम्ही अंधार पडत आलेला म्हणुन खालपर्यंत गेलो नाही. कैंपसाईटकडे परत फिरलो. दिपक आणि संजू मात्र जाउन आले. त्यांना परतायला अंधार झाला म्हणुन कैंपलिडर बडबड करत होता. राजस्थानमध्ये नोव्हेंबर महिन्यात बऱ्यापैकी थंडी असते असे ऐकून होतो. पण आम्हाला मात्र अजिबात थंडी वाजत नव्हती. जेवण बनत होते तोपर्यंत तिकडेच बाजुला असणाऱ्या एका दुकानातून ज्यांना हवे त्यांनी घरी फोन केले. रात्री जेवणानंतर जास्तच धमाल आली. अनुजाच्या मोडक्या डाव्या हाताला आणि माझ्या मोडक्या उजव्या पायाला ऐश्वर्याच्या मोडक्या पायाची सोबत मिळाली. त्याचे झाले असे.. की आमचे जेवण सुरू होते तेंव्हा दुरवर कुठेतरी कुत्रे भुंकत होते. त्यावरून मी काहीतरी जोक मारला आणि ऐश्वर्याला हसण्यासाठी तितके कारण पुरेसे होते. खरेतरं तिला हसायला कारण लागत नाही. हसता-हसता ती मागे सरकली आणि धापकन पडली. पाय मुरगळला आणि दुखत होता तरी मध्येच हसणे सुरूच होते तिचे. माझ्या पायासाठी आणलेले एक्स्ट्रा क्रेप बाँडेज तिला दिले लावायला मग. रात्री पुन्हा एकदा ग्रुपमधले म्हातारे (वयाने) आणि काही तरुण म्हातारे (विचाराने) गुडुप झाले. आम्ही फ़क्त ७ जण जागे होतो कैंपफायर करायला. ११ वाजता झोपायला गेलो तेंव्हा घोरण्याची कोंपिटीशन सुरू झाली होती. आज मी घोरणाऱ्या सर्वांच्या अंगावरुन नाचत थैमान घालेन की काय असे वाटत होते. पण तसे काही मी केले नाही. आज मात्र कालपेक्षा सुरात घोरत होते ३-४ जण. भांडत नव्हते. प्रत्येकाने आपापला टाइमस्लोट घेतला होता. इकडून एकदा तर तिकडून एकदा असे आवाज यायचे. मध्येच संजू खोटे-खोटे त्यापेक्षा जोरात घोरायचा... मी, अभि अणि दिपकची हसून हसून पुरेवाट. आमच्यासारखे अजून २-३ पीड़ित होते. राजस्थान मधलेच होते ते तिघे. त्यातला एकजण उठला आणि त्याच्या पासून दुरवर घोरणाऱ्या एकाला त्याने उशी फेकून मारली. घोरणाऱ्या व्यक्ति अचानक शांत झाली, कुस बदलली आणि पुन्हा घोरायला लागली. आता आम्ही असे फुटलो की काही विचारू नका. अखेर रात्री उशिराने पुन्हा एकदा आमच्या झोपेने घोरण्यावर मात केली आणि आम्ही निद्रेच्या अधीन झालो. उदया सकाळी आम्हाला 'वीरों का मठ' मार्गे कुंभळगड़ येथे पोचायचे होते. कुंभळगड़ - जेथे जन्म झाला महाराणा प्रताप यांचा...
.
.
पुढील भाग : ट्रेक टू अरावली - 'वीरों का मठ' मार्गे 'कुंभळगड़' ... !
.
.
.
.
पुढील भाग : ट्रेक टू अरावली - 'वीरों का मठ' मार्गे 'कुंभळगड़' ... !
.
.
Tuesday, 26 January 2010
ट्रेक टू अरावली - राजस्थान ... सुरवात ... !


खाता-खाता अनुजा लडाख बद्दलच्या गोष्टी सांगत होती तर मध्येच दिपक-अभि-संजूच्या 'हर की दुन'च्या गोष्टी सुरू व्हायच्या. इतके खाल्ले तरी काही समोसे आणि बोंबिल फ्राय उरले. ते एका बैग मध्ये ठेवून खिडकीच्या मध्ये ती लटकवली. आजुबाजुला बसलेले लोक जसे आडवे व्हायला लागले तसे आम्हाला सुद्धा आवाज खाली करावे लागले. उगाच बाकीच्यांना कशाला त्रास नाही का.. आम्ही सुद्धा आडवे झालो. मी आणि अभि समोरा-समोर अप्पर बर्थ वरती झोपलो होतो. पहाटे ३ वाजताच मला जाग आली. (रोहणा ... अजिबात बोलू नकोस कोणाला की तूला अवघ्या ३ तासात भूक लागुन जाग आली) हाताशी जवळच लटकवून ठेवलेल्या समोश्याच्या पिशवीमध्ये हात घालतो तोच अभि जागा झाला. 'भूक लागली आहे ना रे. दे मला पण एक समोसा.' मी बघतच बसलो. अभ्याचे हे रूप मला नवीन होते... समोसा खाल्यावर आम्ही पुन्हा झोपी गेलो. पहाटे अबू रोड आसपास ट्रेन येता-येता आम्ही जागे झालो पण अनुजा मात्र उठून पुन्हा बसल्या-बसल्या लुडकली होती. स्टेशनवर उतरलो तर सगळीकडे 'रबडी' आणि 'पापडी चाट'वाले दिसत होते. हातात वेळ नव्हता म्हणुन ती संधी हुकली आणि गाडी अबूवरुन 'फालना'ला निघाली. आम्हाला फालना वरुन 'रणकपुर'ला जायचे होते. तिकडून पुढे मग ट्रेक होता. आम्ही फालनाला पोचल्याची वर्दी रतनसिंग भाटी यांना दिली आणि एका जीप मधून रणकपूर जैन मंदिराजवळ असलेल्या बेसकैंपला पोचलो. तिकडे मुंबईचे काही लोक भेटले. ते ट्रेक पूर्ण करून परतत होते. आम्ही सामान लावले, जेवून घेतले आणि गप्पा मारात बसलो. संध्याकाळी 'रणकपूर जैन मंदिर' बघायला गेलो. 'एक्लमटायझेशन' म्हणजे वातावरणाशी समरस होण्याचा तसा काही प्रश्न नव्हता. तासभर मंदीर बघून कैंप वर परत आलो. ग्रुप मधल्या इतर लोकांशी ओळख करून घेतली. कोणी बंगालमधले तर कोणी गुजरात, कोणी दक्षिणात्य तर कोणी उत्तरेकडचे. १८ एकजण होते एकुण. त्यात आम्ही ७ जण 'जय महाराष्ट्र' होतो. YHAI चे हे एक मस्त असते. अनेक विविध ठिकाणच्या लोकांशी ओळखी होतात. नव्याने बरीच माहिती कळते. अजून एक उत्तम गोष्ट म्हणजे YHAI च्या कुठल्या ही कैंपला 'कैंपफायर' होत नाही. लाकडे कधीच जाळली जात नाहीत. रात्रीच्या जेवणानंतर सर्वजण एकत्र जामुन.. 'फायर..फायर..कैंपफायर..' असे म्हणुन फारतर एखादी मेणबत्ती पेटवून कैंपफायरला सुरवात करतात. आजच्या गप्पांना काही मज्जा आली नाही. ग्रुप मधले म्हातारे (वयाने) आणि काही तरुण म्हातारे (विचाराने) आधीच गुडुप झाले होते. आम्ही तासभर दंगा केला आणि १० वाजता आपापल्या टेंट्स मध्ये जाउन बत्ती गुल केली. पण झोप लागेल तर ना... का विचारताय... घोरण्याची कोंपिटीशन सुरू होती तिकडे. अशी की आता घोरण्यात सुद्धा जोरदार भांडतील की काय. डोके उठले होते अक्षरश:. ह्यांच्या बरोबर ५ दिवस राहायचे... एका टेंट/ खोलीत झोपायचे? च्यामारी... बघुया पुढे पुढे काय होते ते...
.
.
पुढील भाग : ट्रेक टू अरावली - मालघाट मार्गे फूटादेवल ... !
.
.
Subscribe to:
Posts (Atom)