Thursday, 21 June 2012

सिक्कीमचा सफरनामा - भाग ३ : एम.जी.रोड...

एम.जी.रोडला जाण्यासाठी निघालो तेंव्हा अंधार पडत आला होता. आम्ही निघालो तेंव्हा प्रधानबाईंचा मुलगा आशिष देखील गाडीत पेट्रोल भरण्यासाठी त्याच बाजुला जाण्यासाठी निघत होता. त्याने आम्हाला लिफ्ट दिली. आम्ही पोचलो तेंव्हा रस्त्यावर सर्वत्र रोशणाई केलेली दिसली.


११-१५ मे तिथे समर कार्निव्हल होउन गेला होता. कार्यक्रम संपले असलेले तरी रोशणाई मात्र कायम होती. एम.जी.रोड हा दुतर्फा १००-१५० दुकाने असलेला गंगटोक मधला शॉपिंग स्ट्रीट आहे. मध्ये मध्ये रेस्टॅरंट देखील आहेत. म्हणजे फिरताना भुक लागली तरी हरकत नाही. दुतर्फा असलेल्या सर्व बिल्डिंग्स खरेतर हॉटेल्स आहेत. खाली दुकाने आणि वरती रुम्स असे एकंदरीत चित्र आहे. आता ह्या रस्त्यावर वाहनांना बंदी आहे. रस्त्याच्या सुरुवातीला महात्मा गांधींचा पुतळा आहे.


विजेचे खांब आणि त्यावर सजावटीसाठी टांगलेल्या रंगेबिरंगी फुलांच्या कुंड्या लक्ष्य वेधुन घेतात. दर काही फुट अंतरावर बसायला बाकडी ठेवलेली आहेत. फिरुन दमलात की हवतरं जरा बसुन दम खा. काही खरेदी करायची नसेल तरी संध्याकाळी उगाचच फिरायला हा एक मस्त स्पॉट आहे. आम्ही गंगटोक मध्ये ४ दिवस असणार होतो त्यामुळे लगेच शॉपिंग करण्याऐवजी तासभर चक्कर मारली आणि कुठे कुठे काय काय मिळतयं ते पाहुन घेतले. संध्याकाळी ज्या मग्स मध्ये चहा-कॉफी घेतली होती ते देखील पाहिले. अचानक फिरता फिरता महाराजा स्विट मार्ट समोर जाउन पोचलो. पुढे काय सांगायची गरजच नाहिये.


फिरता फिरता २ तास कसे निघुन गेले कळलेही नाही. शेवटी घरी जाण्यासाठी निघालो. टॅक्सीस्टॅण्ड वरुन टॅक्सी घेतली आणि जाता-जाता हा रस्त्याचा घेतलेला एक फोटो.संध्याकाळच्या जेवणासाठी घरी परतलो तेंव्हा ८ वाजुन गेले होते आणि गरमा-गरम जेवण तयार होते. डाळ-भात, चपाती आणि बांबु शुटची भाजी. सोबत भेंडी आणि खास आलुकी सब्जी. रायता आणि पापड. एकंदरीत मस्त जेवण होते.

मी सुटकेचा निश्वास टाकला कारण मी ही जागा ऑनलाईन बुक केली होती. रुम्स आणि जेवण कसे असेल ह्याबद्दल मनात जी साशंकता होती ती आता दुर झाली होती. उद्यापासुन खर्‍या अर्थाने सिक्किम बघायला निघायचे होते. त्यामुळे आवरुन घेतले आणि झोप येईपर्यंत गप्पा टाकत बसलो. सुरुवात तर छान झाली होती...

********************************************

एम.जी.रोडवर असलेल्या सुविधा...

एस.बी.आय, अ‍ॅक्सिस बँक अश्या अनेक बँक्सचे एटीम.
सायबर कॅफे
डी.एच.एल आणि ब्लु डार्ट (सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत सुरु)
सिक्किम पर्यटन माहिती केंद्र
अनेक हॉटेल्स आणि रेस्टॅरंटस
टॅक्सी स्टॅण्ड.

क्रमशः ... सिक्कीमचा सफरनामा - भाग ४ : गंगटोक स्थळदर्शन...


10 comments:

 1. समस्त खादाडी फ़ोटोचा जोरदार णि षे ध.........

  जायला मिळालं तर काय विकत घ्यायचं हे ठरवायला ही माहिती भारी आहे....श्रीताई तू शॉपिंग केलंस का (एक भाबडा प्रश्न...:) )

  ReplyDelete
 2. ते सगळं ठीक आहे..पण..
  सिक्कीमचा प्रसिद्ध 'सुपर लोटो' खेळलात की नाही :P

  ReplyDelete
 3. ईशान्य भारताची आपल्या इतर प्रांतांशी नळ घट्ट जुळण्यास अश्या कसदार व माहितीपूर्ण प्रवास वर्णांची नेहमीच मदत होते.

  ReplyDelete
 4. एखादा मुखवटा विकत घेतलास की नाही ? फोटो मस्त ! :)

  ReplyDelete
 5. class travelogue ahe. surekh. pudhche parts pan wachle. good read.

  ReplyDelete
 6. पहिल्या दिवशीचे जेवण भलतेच खास होते. अपेक्षा जास्ती ठेवल्याच नव्हत्या न आपण त्यामुळे अजूनच मस्त वाटले.

  ReplyDelete
 7. एकंदरीत शॉपिंग जोरदार झालेली दिसते आहे :) :)

  विभि+१

  ReplyDelete
 8. अपर्णा.. ४ दिवस ह्या दोघी शॉपिंगच करत होत्या.. ;)

  बाबा.. अरे हो. ते राहिलेच. तिथे दुकाने दिसली नाहीत पण.. :)

  धन्यवाद निनाद...

  अनघा.. कशासाठी गं? इथे तसेही सर्व मुखवटेच घालून वावरत असतात ना... :)

  धन्यवाद AJ

  श्री ताई.. अपेक्षा वाढल्या त्या जेवणाने.. :D

  होय रे यवगेशा.. :D

  ReplyDelete
 9. are kitti diwasnni vachla tujha blog :) khoop ch mast...aamhi pan last April madhe sikkim la jaun aalo tyachich aathvan zali

  Gangtok kiti jast swachcha aahe aani tithlya lokanna shistsuddha aahe! itke traffic jams pahile pan ugach madhech gadi ghaltana kunich nahi disla

  ReplyDelete
 10. सुंदर फोटॊ आले आहे आहेत.

  ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...