आम्ही गंगटोक स्थलदर्शनमध्ये आज २ मॉनेस्ट्री पाहणार होतो. एक शहराच्या अगदी जवळच असलेली जोरगाँग आणि दुसरी दक्षिण सिक्किम मधील रुमटेक. ह्या दोन्ही मॉनेस्ट्रींबद्दल थोडीफार माहिती आणि फोटो...
आतमध्ये प्रवेश केल्यावर लक्ष्यात आले की रंगकाम सुरु आहे. बुद्धमुर्ती देखील नव्याने बनवण्यात येत होती. या खेरिज आतमध्ये खेंपो बोधीसत्व, गुरु पद्मसंभव आणि चोग्याल त्रायसाँग यांच्या मुर्ती आहेत.
धर्मगुरु चोग्याल त्रायसाँग यांनी ८ व्या शतकात भारतात अनेक तिबेटी तरुण पाठवुन बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिता अनेक संतांना तिबेट मध्ये बोलावणे धाडले होते. पुधे त्यांनी तिबेट मध्ये 'सम्ये' बुद्ध विद्यापिठाची स्थापना केली जिथे बुद्ध धर्मावरील सर्व लिखाण संस्कृत मधुन तिबेटियन भाषेत भाषांतरीत केले गेले.
खेंपो बोधीसत्व हे धर्मगुरु चोग्याल त्रायसाँग यांच्या बोलावण्यावरुन भारतातुन तिबेटमध्ये गेलेले पहिले बुद्ध संत होते. त्यांनी तिबेटमधील भिक्षुंमध्ये सुरु केलेली 'विनय परंपरा' आजही तिबेटसह सिक्किम, नेपाळ आणि भुतानमध्ये सुरु आहे.
या तीन धर्मगुरुंना 'खें - लोप - चो - सम' असे संबोधले जाते.
खें - खेंपो बोधीसत्व, लोप - गुरु पद्मसंभव आणि चो - चोग्याल त्रायसाँग.
आम्ही आत जाणार इतक्यात एका सिक्किमिज गाईडने मला 'माहिती हवी का?' असे चक्क मराठीत विचारले. पहिले २ सेकंद मला कळलेच नाही पण मग लक्षात आले की अरे हा तर चक्क मराठीत बोलतोय. आम्ही त्याला गाईड म्हणुन सोबत घेतले. त्याने आम्हाला बहुतेक माहिती मराठीतुन दिली. काही इंग्रजी-हिंदी मधुन. महाराष्ट्रातुन दरवर्षी इतके पर्यटक सिक्किमला जातात की त्याने मराठी शिकुन घेतली असावी. :) हे नक्कीच सुखावणारे होते.
मॉनेस्ट्रीच्या भिंतींवर अनेक चित्रे रंगवलेली आहेत. खालील ४ चित्रे ही मॉनेस्ट्रीची रक्षा करणार्या द्वारपालांची आहेत. सर्वात शेवटी आहेत आपले बाप्पा. बुद्ध संस्कृतीत गणपतीचे उल्लेख कुठे कुठे येतात ते ठावुक नाही पण असे चित्र लेहच्या अल्ची मॉनेस्ट्रीमध्ये देखील पाहिल्याचे स्मरते.
सिक्कीमचा सफरनामा - भाग ६ : गंगटोक स्थळदर्शन (उर्वरीत) ...
प्रश्र्न-उत्तराचा खेळ ?? म्हणजे ??? कोडी घालत होते का एकमेकांना ??
ReplyDeleteफोटो छान. आणि ते चित्रकार असे बसूनबिसून रंगवताना तर भारीच ! चित्र सुंदर आहेत ! मी कुर्ग आणि बँकॉक ह्या दोन ठिकाणी बघितले आहेत हे बौद्ध मठ. :)
असेच काही समज. प्रश्नाचे उत्तर बरोबर आले तर टाळी मारून प्रत्युत्तरही द्यायचे.. :)
ReplyDeletePhotos khoop chhan aahet saglech :)
ReplyDeleteaani aamhi pan to khel pahila...khoop chhan vatat hota :)
ek frame common aaliye!
ReplyDeletehttp://photo.net/photodb/photo?photo_id=5814220
केसरीच्या सहलींमुळे त्या गाईडने किती हुशारीने मराठी शिकून घेतलेले नं! :)
ReplyDeleteभिख्खूचा तो खेळ आणि त्यांची फायनल टाळी मला फारच आवडली. आपण सगळे जमलो की एकदा खेळायला हवे... :D :D
पुनम.. कधी गेली होतीस?
ReplyDeleteआकाश.. आहेस कुठे? नवीन मोहिम कुठली कढतो आहेस आता? ;)
श्री.. मला तर एक क्षण कळलेच नव्हते. आपण तिथे अजुन काही वेळ काढला पाहिजे होता. कदाचित आपल्याला सुद्ध खेळात घेतले असते त्यांनी.. ;)