Sunday 17 June 2012

सिक्कीमचा सफरनामा - भाग १ : पूर्वतयारी ... !


होळीच्या दिवशी पुरणपोळ्या खाण्यासाठी आमच्या घरी काही मित्र-मैत्रिणी जमलो होतो. गप्पा मारता-मारता शमिकाने अचानक सिक्कीमचा विषय काढला. सिक्कीमला जायचे हा विषय तसा तिच्या डोक्यात गेली १० वर्षे होता. अनघा, राजीव काका यांनी तो विषय उचलून धरला. सुहास, दिपक, ज्योती आणि आकाने मात्र सुट्टीच्या कारणाने हात वर केले. दुसर्‍या दिवशी भाग्यश्रीताईने देखील नक्की येणार असे पहिल्या सेकंदाला कळवून टाकले. बघता बघता आम्ही ५ जण तयार झालो आणि मग माझी पुढची तयारी सुरू झाली.


पुढच्या ३-४ दिवसात जालावरून बरीच माहिती मिळवून सिक्कीमला काय-काय बघायचे, सिक्कीमच्या नकाशात ह्या जागा कुठे आहेत त्याप्रमाणे कसे कसे बघायचे याचा एक तक्ता बनवला. एकुण किती दिवस लागतील, प्रवासाचे साधन काय असावे, कुठे राहावे, एकुण खर्च किती येईल ह्यावर संपूर्ण महिन्यात मी, शमी, अनघा, श्री आणि राजीव काका सतत मेल्स मधून माहितीची देवाण-घेवाण करत होतो. तारखा नक्की झाल्यावर पाहिले विमानाची तिकिटे बुक करून घेतली. जालावरुन महिती मिळवताना सिक्किम पर्यटन या संकेतस्थळाचा खुप फायदा झाला. सर्व हॉटेल ऑन्लाईनच शोधुन बुकिंग्स केली. नरेंद्र गोळे काकांनी नुकतीच सिक्किम सहल केल्यामुळे त्यांच्याकडुनही थोडी माहिती मिळु शकली. माझा मित्र सुहास जोशी याने सिक्किम मधला सर्वात महत्वाचा संपर्क मला दिला. तो म्हणजे श्री. तांबे.

श्री तांबे हे सध्या सिक्किम येथे केंद्र सरकारतर्फे विशेष अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. त्यांनी सिक्किम स्प्रिंग्स हे संकेतस्थळ नुकतेच विकसीत केले आहे. ह्याच धर्तीवर आता सह्याद्री स्प्रिंग्स हे संकेतस्थळ विकसीत होत आहे. श्री. तांबे यांच्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाची मदत झाली. त्यांनी आम्हाला सोनम भुतिया, ज्यांचा सिक्किम येथे पर्यटनासाठी गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे, यांच्याशी भेट घालुन दिली. ह्या सोनमने आम्हाला संपुर्ण प्रवासात त्याच्याकडचा खास ड्रायव्हर सत्यम गुरुंग आणि त्याची झाय्लो गाडी पुर्ण वेळ दिली होती. हा सत्यम उर्फ सत्या आमचा भलताच चांगला दोस्त बनला. त्याचे किस्से पुढे येतीलच. :) पुर्व आणि उत्तर सिक्किम येथे जाण्यासाठी लागणारे परमिट देखील सोनम यांनी आम्हाला बनवुन दिले.


एकंदरीत सर्व पूर्वतयारी झाली आणि शेवटच्या काही दिवसात अनघाने कामाच्या कारणाने यायचे रद्द केले. शेवटी आम्हा ४ जणांचा १३ दिवसांचा कार्यक्रम असा ठरला...

१५ मे - मुंबईवरुन विमानाने प्रयाण. दुपारी जमेल तसे आणि तेवढेच कोलकत्ता दर्शन. रात्रीच्या ट्रेनने न्युजलपायगुडी येथे प्रयाण.
१६ मे -  न्युजलपायगुडी ते गंगटोक प्रवास.

१७ मे - गंगटोक स्थळदर्शन.
१८ मे - पुर्व सिक्किम स्थळदर्शन. नथु-ला, चांगु लेक आणि, बाबा मंदिर वगैरे.

१९ मे - दक्षिण सिक्किम स्थळदर्शन. नामची, चारधाम वगैरे.

२० मे - उत्तर सिक्किम स्थळदर्शन. गंगटोक वरुन लाचुंग येथे प्रयाण.
२१ मे - झिरो पॉईंट, युमथांग बघुन लाचेन येथे पोचणे.
२२ मे - गुरुडोंग्मार लेक पाहुन गंगटोकमध्ये परत.

२३ मे - पश्चिम सिक्किम स्थळदर्शन. युकसुम वगैरे.
२४ मे - पश्चिम सिक्किम स्थळदर्शन करुन दार्जिलिंग पोचणे.

२५-२६ मे - दार्जिलिंग स्थळदर्शन.
२७ मे - बागडोगरा येथे पोचून कोलकत्तामार्गे परतीचा प्रवास.

सदर सफरनामा १०-१२ भागात येथे सादर करायचा मानस आहे. अर्थात भरपूर फोटो येतीलच. 

क्रमश:... सिक्कीमचा सफरनामा - भाग २ : गंगटोकच्या दिशेने...


15 comments:

  1. लय भारी.. किती दिवसांनी सेनापतींची पोस्ट आली !! पुढचा भाग टाका लवकर !

    ReplyDelete
  2. धन्यवाद. दररोज १ भाग येईल याची काळजी घेऊ. :)

    ReplyDelete
  3. Heramb barobar sahamat...
    Liwa bigi bigi....:)

    ReplyDelete
  4. "सिक्कीम" आता मला पुनश्च लुभावणार ही खात्री होतीय :)

    ReplyDelete
  5. वटवटच्या म्हणण्याप्रमाणे पुढचे भाग येऊ दे पटपट!!!

    ReplyDelete
  6. हम्म, सगळ्यांना विचारले होतेस तर... मी सोडून.

    ReplyDelete
  7. लिही बाबा भरभर :)

    ReplyDelete
  8. मुजरा, सेनापती! खूप उत्सुकता लागली आहे...... तसंच नुकतंच तिबेटबद्दल बरंच काही वाचलं आहे (आणि वाचत आहे); त्यामुळे सिक्कीम, दार्जिलिंग ह्याबद्दल उत्सुकता आहे. आपल्या नजरेतून सिक्कीम- तिबेट ह्या संबंधांवर (लिंकेजेसवर) प्रकाश पडेल, ही अपेक्षा. बाकी आपल्या लदाखच्या बहारदार सफरनाम्याप्रमाणेच हा असणार आहे....... प्रतीक्षेत.

    ReplyDelete
  9. श्री, राजीव काका.. ब्लॉग नीट वाचा. काही चुका दिसल्या तर कळवा. :)

    पंकज भाऊ.. असे नाही हो. पुढच्या वेळी तुम्हाला नक्की विचारू.

    बाबा.. तू काय मला लिही 'बाबा' लवकर असे म्हणतो आहेस.. :D

    निरंजन.. इतिहासाच्या नजरेतून तिबेट बद्दल लिखाण होईलच. :)

    ReplyDelete
    Replies
    1. ARE ROHAN, I will be glad to know if u r planning such tour in near future. Please let me know. I would like to join u people in such tour

      Delete
  10. Rohan, really i also want to joint with u people in such tour. Please noted dis point. :-)

    ReplyDelete
  11. हुश्श...अखेरीस आज ब्लॉग अ‍ॅक्सेस झाला...आत्ता वाचायला सुरुवात करतो :) :)

    ReplyDelete
  12. सहीये.........मस्तच......

    भटकंतीचे सुख आम्हाला अशा लिखानातुनच मिळते........

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...